Thursday, 22 February 2018

Harihar fort (हरिहार गड)

                                                             
                                                                   हरिहार गड

                                 
                                         

                                       
           
गुणक
नाव
हरिहर
उंची
३५०० फूट
प्रकार
गिरिदुर्ग
चढाईचीश्रेणी
मध्यम
ठिकाण
नाशिक जिल्हामहाराष्ट्रभारत
जवळचेगाव
जुन्नर
डोंगररांग
त्र्यंबकेश्वर




















गडाची माहिती:
नाशिक जिल्ह्यातील सेलबारी - डोलबारी रांग, अजंठा - सातमाळ रांग, त्र्यंबक रांग या डोंगररांगात अनेक गडकिल्ले आहेत. हरिहर किल्ला त्र्यंबक रांगेतील प्रमुख किल्ला आहे. प्राचिन काळापासून महाराष्ट्रातील बंदरात उतरणारा माल अनेक घाट मार्गांनी नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. यातील त्र्यंबक रांगेतून जाणार्या गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हरीहर भास्करगड यांची उभारणी करण्यात आली होती.
नाशिकच्या पश्चिमेस आणि इगतपूरीच्या उत्तरेस त्र्यंबक रांग पसरलेली आहे या रांगेचे दोन प्रमुख भाग पडतात एका भागात बसगड, उतवड, फणीचा डोंगर, हरिहर आणि त्रिंबकगड हे किल्ले येतात. तर दुसर्या भागात अंजनेरी, घरगड हे किल्ले येतात. वैतरणा ही या परिसरातील प्रमुख नदी आहे. पायथ्याच्या गावातून हरिहर आयताकृती भासतो.
पुर्वपश्चिम पसरलेली त्रंबकरांग भास्करगडापासून सुरु होवून हर्षगड, त्रंबकगड, अंजनेरी, रांजणगिरी असे किल्ले आपल्या कवेत घेवून धावते.
भास्करगडाच्या पुर्वेला आणि त्रंबकगडाच्या पश्चिमेला हर्षगड आपला कातळमाथा उंचावून उभा आहे. हर्षगडाला जाण्यासाठी दोन चार मार्ग हे ट्रेकिंगच्या
दृष्टीने उत्तम आहेत. हर्षगडाच्या दक्षिण पायथ्याला टाकेहर्ष म्हणून लहानसे गाव आहे. येथून तासाभरात आपण हर्षगडाचा पायथा गाठू शकतो. तसेच उत्तर बाजुला असलेल्या जांभुळपाडा या गावाकडूनही भास्करगडाच्या खिंडीत येवून भुंडी, फणी, असे डोंगर ओलांडून आपण हर्षगड गाठू शकतो. मात्र जांभुळपाडा गाठण्यासाठी मोठा वळसा घ्यावा लागतो हे लक्षात असू द्यावे.
टाकेहर्ष हे गाव नाशिक ते खोडाळा या गाडीरस्त्यावर आहे. नाशिक कडून येताना अंजनेरीचा किल्ला ओलांडल्यावर डावीकडे इगतपुरीकडे जाणारा फाटा आहे. या फाटय़ावरुन पुढे निघाल्यावर इगतपुरीकडे जाणारा रस्ता सोडून उजवीकडे वळाल्यावर आपण खोडाळाच्या दिशेने जावू लागतो. या वाटेवर आखलीहर्ष, टाकेहर्ष अशी गावे लागतात. ठाण्याकडून येताना कसारा घाटाच्या सुरवातीलाच खोडाळा तसेच जव्हारकडे जाणारा गाडीमार्ग आहे. येथून खोडाळा कडूनही आपण टाकेहर्ष गाठू शकतो. टाकेहर्ष कडून साधारण चारपाच तासांचा अवधी हाताशी ठेवून सोबत पाणी आणि खाण्याचे साहित्य घेऊन हर्षगडाकडे प्रयाण करावे.
हर्षगडाचा उभा असलेला कातळमाथा लक्षवेधी असला तरी त्याच्या चहुअंगाचे सरळसोट कडे मात्र आपल्याला धडकी भरवतात. गडावर चढण्यासाठी उत्तरबाजु कडून वाट आहे ही एकमेव वाट पायर्यांची आहे. उभ्या कातळात या पायर्या कोरुन काढलेल्या असल्याने दमछाक करणार्या आहेत. टाकेहर्षकडून तासादीड तासात आपण येथ पर्यंत पोहचू शकतो.
हर्षगडाच्या नावात जरी हर्ष असला तरी पायर्या चढताना मात्र तो हर्ष मावळतो. जसजश्या पायर्यांनी आपण वर चढतो तस तसा विस्तृत प्रदेश दिसासला लागतो. पायर्यांच्या माथ्यावर प्रवेशद्वार आहे. एवढे प्रवेशद्वार अडवले की हा किल्ला शत्रुला जिंकणे कठीणच आहे.
गडाचा माथा लहान लांबोळका आहे. चारही बाजुने ताशीव कडे असल्यामुळे तटबंदीची आवश्यकता नव्हती. पाण्याची टाकी, घरांची जोती, दारु कोठार अशा गडपणाचा खुणा किल्ल्यावर पहायला मिळतात. गडाच्या माथ्यावरुन भास्कर, उतवड, भुंडी, फणी, वाघेरा, त्रंबकगड, अंजनेरी तसेच स्वच्छ वातावरण असल्यास सिद्धगड आणि माहूलीची रांगही दिसते.
या किल्ल्याचे नाव हर्षगड का पडले ? याची एक कथा या भागात प्रसिद्ध आहे. हर्षगड हा मराठय़ांच्या ताब्यात होता तेव्हाचीही कथा एकदा मोघलांच्या एका सरदाराने किल्ल्याला वेढा घातला. किल्ला दुर्गम असल्यामुळे तो मोघलांना जिंकता येईना. गडावर फक्त पन्नास-साठ लोकांचीच शिबंदी होती. ती शिबंदी बाहेरुन होणार्या मदतीच्या प्रतिक्षेत होती. तर मोगल सरदार किल्ल्याची रसद रोखण्यावर भर देत होता. किल्ल्याची कोंडी केली तर मराठय़ांना अन्नपाण्याचा तुटवडा जाणवेल आणि त्यांना गड सोडावा लागेल अशी योजना आखून गडाचा वेढा आवळला होता. महिन्या दोन महिन्यात बाहेरुन मदत आली नाही. येण्याची काही आशाही दिसत नव्हती. रसदीशिवाय परिस्थिती बिकट होत आली होती. गडावर एक म्हातारी होती. तिने वेढा उठवण्यासाठी एक युक्ती केली. गडावरील शिबंदीची जेवण उरकल्यावर खरकाटय़ा पत्रवळ्या गोळा केल्या. त्याबरोबर शेकडो पत्रावळ्या मिसळून त्याही खरकाटय़ा केल्या. गडावर तोफांचे बार काढण्यात आले. नगारे कर्णे वाजवण्यात आले. गडावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे गडाखाली गोळा झालेले मोघल चकीत झाले. ते वर पाहू लागले. म्हातारीने कडय़ावरुन नेहमीप्रमाणे पत्रावळ्या खाली टाकण्यास सुरवात केली. मोघलांनी विचार केला की रोज पन्नाससाठ पत्रावळ्या खाली पडतात म्हणजे गडावर पन्नास एक लोक असावेत पण आज दोन अडीचशे पत्रावळ्या खाली पडल्या म्हणजे मराठय़ांना गडावर रसद आणि सैन्याची जादा कुमक मिळाली असावी म्हणूनच गडावर आनंदोत्सव साजरा होतोय. म्हणजे आता गड जिंकणे अवघडच की? मोघल सरदार वेढा उठवून चालता झाला. म्हातारीच्या युक्तीने वेढा उठल्याचा सर्वांना हर्ष झाला म्हणून गडाचे नाव हर्षगड असे झाले.


गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे:
कोणत्याही वाटेने किल्ल्यावर येतांना आपण किल्ल्याच्या कातळ भिंतीपाशी पोहोचतो. या कातळात पायर्या खोदलेल्या आहेत आणि जागोजागी आधारासाठी खोबण्या सुद्धा केलेल्या आहेत. या पायर्या चढून गेल्यावर समोरच एक दरवाजा लागतो. पुढे डोंगरांची एक कपार आहे. येथून चालत थोडे पुढे गेल्यावर पुन्हा काही पायर्या लागतात. या पायर्या चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या मुख्य द्वारापाशी पोहोचतो. या द्वारातून आत शिरल्यावर आपण किल्ल्याच्या पठारावर पोहोचतो. किल्ल्याचे पठार तसे निमुळतेच आहे. मध्येच एक उंचवटा आलेला आहे.
पायवाटेने थोडेसे पुढे गेल्यावर डावीकडे खाली कड्यात एक गुप्त दरवाजा आढळतो, मात्र तेथे जाण्याचा मार्ग सद्यस्तिथीला अस्तित्वात नाही. थोडे पुढे गेल्यावर हनुमानाचे आणि शंकराचे छोटेसे मंदिर आहे. समोरच पाण्याचा मोठा तलाव आहे. तलावातील पाणी पिण्यास योग्य आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर एक इमारत आढळते. या इमारतीत दोन खोल्या आहेत. या इमारतीमध्ये १० ते १२ जणांना राहता येते. इमारतीच्या एका बाजूला पाण्याची टाकी आहेत. यातील एका टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. गडाचा घेरा फारच निमुळता असल्याने एक तासात गड फेरी आटोपता येते.

सरळसोट दगडी जिन्याचा मार्ग
गुप्त दरवाजा
हनुमानाचे आणि शंकराचे छोटेसे मंदिर
पाण्याची टाकी
गडावर जाण्याच्या वाटा

सरळसोट दगडी जिन्याचा मार्ग:



गुप्त दरवाजा:


हनुमानाचे आणि शंकराचे छोटेसे मंदिर:



पाण्याची टाकी:





गडावर जाण्याच्या वाटा:





हरिहार गडावर जाण्याचे मार्ग:
किल्ल्यावर जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत, पुढे दोन्ही मार्ग एकाच ठिकाणी येऊन मिळतात.
"निरगुडपाडा" हे गाव खोडाळा - त्र्यंबकेश्वर मार्गावर आहे. त्र्यंबकेश्वर पासून २० किमी वर निरगुडपाडा गाव आहे. येथे जाण्यासाठी मुंबईहून मार्ग आहेत.
)मुंबई - कल्याण - कसारा - खोडाळा - निरगुडपाडा ( १९४ किमी),
) मुंबई - कल्याण - भिवंडी - वाडा - खोडाळा - निरगुडपाडा (१९० किमी)
तसेच इगतपूरी नाशिकहून त्र्यंबकेश्वरमार्गे निरगुडपाड्याला जाता येते. हरीहरगड भास्करगड या दोनही गडांच्या पायथ्याचे गाव निरगुडपाडा आहे.
. कसारा किंवा नाशिक मार्गे :-
कसारा किंवा नाशिक मार्गे इगतपूरी गाठावे. इगतपूरीहून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी बस पकडावी. वाटेत असणारे निरगुडपाडा हे हरिहरच्या पायथ्याचे गाव आहे. गावातून किल्ल्यावर जाण्यास दोन तास पुरतात. हरिहरच्या कातळभिंती जवळ पोहोचल्यावर पुढे किल्ल्यावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्या आहेत.
. इगतपूरी - त्र्यंबकेश्वर - खोडाळा मार्गे :-
निरगुडपाडा गावाच्याच पुढे कासुर्ली नावाचे गाव आहे. इगतपूरी-त्र्यंबकेश्वर-खोडाळा या बसने या गावात उतरता येते. या गावातून समोरच्या डोंगरावर चढून गेल्यावर हर्षेवाडी नावाची वाडी लागते. या वाडीतून या किल्ल्यावर पोहोचण्यास तास लागतो. ही वाट सोपी आणि कमी दमछाक करणारी आहे.

किल्ल्यावर राहण्याची सोय:
किल्ल्यावर राहण्यासाठी इमारत आहे. यात १० ते १२ जणांना राहता येते.
जेवणाची सोय:
किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्यामुळे स्वता करावी.
पाण्याची सोय:
गडावर बारमाही पिण्याच्या पाण्याची सोय आहे . परंतु पिण्याच्या पाण्याची निघा चांगली न राखल्याने ते पिण्यायोग्य राहिलेले नाही.



             जय भवानी जय जिजाऊ जय शिवाजी जय संभाजी

No comments:

Post a Comment